Wednesday, March 8, 2017

सामाजिक काम म्हणजे पायरी चढण्यास केलेली मदतपूर्वप्रसिद्धी- लोकमत ऑक्सिजन, २ मार्च, २०१७

तुमच्या मते सामाजिक काम म्हणजे काय? त्याची गरज व व्याप्ती काय? या प्रश्नाला दिलेले उत्तर...
माणूस हा एकटा राहणारा प्राणी नसून तो समूहात राहतो. माणसे परस्परावलंबी असतात, एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. स्वतःची उपजिविका करताना समाजातल्या कोणाला तरी उपयोगी पडण्याखेरीज माणसाला गत्यंतर नाही.त्याअर्थाने सामाजिक कामच करतात.
राजकीय पक्ष, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, CSR संस्था इथपासून गरजूंना वैयक्तिक मदत करणारे लोक हे सर्व सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने काम करतात (किमान असे बोलतात.). शेतकरी, कुंभार, लोहार, बॅंक कर्मचारी,शिक्षक इ. लोक आपल्या कामाला सामाजिक म्हणत नसले तरी समाजाच्या कुठल्या न कुठल्या घटकांच्या गरजा पूर्ण करण्याचेच काम करतात.
थोडक्यात सामाजिक काम म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या गरजा पूर्ण करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे.मनुष्याच्या गरजा काय असतात याविषयी अब्राहम मास्लो या मानसशास्त्रज्ञाने एक उतरंड मांडली आहे, तिच्या पाय-या पुढीलप्रमाणे-
Image result for maslow pyramid in marathi
) शरीर चालण्याची गरज - श्वसन, अन्न, पाणी, झोप, उत्सर्जन, समागम
) सुरक्षित वाटण्याची गरज - शरीराची, नोकरीची, आरोग्याची, संपत्तीची, कुटुंबाची सुरक्षितता
) प्रेम व आपुलकीची गरज – मैत्री, कुटुंब, आत्मीयता
) आदराची गरज – आत्मसन्मान, आत्मविश्वास, यश, इतरांकडून आदर, इतरांचा आदर
) स्वतःच्या पूर्ण क्षमतेने जगण्याची गरज – नैतिकता, सर्जनशीलता, ऊत्स्फूर्तता, समस्या सोडवण्याची क्षमता,पूर्वग्रहांचा अभाव, सत्याचा स्वीकार
मास्लोच्या म्हणण्यानुसार प्रत्येक माणसाला पूर्ण क्षमतेने जगण्याची (पायरी क्र. ) प्रेरणा असते. मात्र बहुतेक वेळा माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पायरीच्या गरजा निर्माण होतात. समाजातील निरनिराळे घटक गरजांच्या निरनिराळ्या टप्प्यावर असतात. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावे पाण्याच्या अभावी पहिल्या पायरीवर असेल. शेतक-यांना शेतमालाच्या हमीभावाची (सुरक्षितता) गरज असेल. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले गेले त्यांना प्रेम, आपुलकीची व आदराची गरज असेल. IIT मधून पास होणा-या इंजिनिअर्सना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणा-या आव्हानांची गरज असेल.
याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार कोणत्या घटकाच्या गरजा पूर्ण करायच्या याची निवड करू शकतो. किती empowering गोष्ट आहे ही! प्रत्येकजणच सामाजिक कार्यकर्ता होऊ शकतो. सामाजिक काम करणारे नैतिकदृष्ट्या इतरांपेक्षा उच्च हाच मुळी गैरसमज ठरतो. सामाजिक काम करणारे आणि सर्वसामान्य हा भेदच संपून जातो.
पण... भारताबाबत बोलायचे झाले तर आज मास्लोच्या पहिल्या व दुस-या पायरीच्या गरजा पूर्ण करतानाच बहुसंख्य लोक झगडत आहेत. गरीबी, व्यसने, बेरोजगारी, बालमृत्यू, कुपोषण, दुष्काळ इ. समस्यांनी हे लोक त्रस्त आहेत. माणसापलीकडे विचार केल्यास जंगले, जैवविविधता, नद्या हेही अस्तित्वासाठी झगडत आहेत. मात्र त्याचसोबत बुद्धीजिवी मध्यमवर्ग मास्लोच्या पाय-या पटापट चढत चौथ्या-पाचव्या पायरीवर पोचला आहे.आपल्याला समाज म्हणून एकत्र पूर्ण क्षमतेने काम करायचे असेल, तर पुढच्या पायरीवरील लोकांनी मागच्या पायरीवरच्या लोकांना पाय-या चढण्यासाठी सक्षम होण्यास मदत केली पाहिजे.


निखिल जोशी

या गाडीला ब्रेक नाही...

पूर्वप्रसिद्धी - सीमोल्लंघन, जानेवारी-फेब्रुवारी, २०१६

२०१६ च्या सीमोल्लंघनचा हा पहिला अंक. आज थोडा pause घेवून २०१५ अखेरच्या भारताचा एक snapshot घेवूया. लोकसंख्या, प्रदूषण, कचरा, उद्योगधंदे, रोजगार, शिक्षण वगैरे अनेक गोष्टींनी मिळून हा snapshot बनेल. त्यातील फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चे २०१५ चे चित्र थोडे जवळून पाहू.

मोबाईल आणि इंटरनेट संबंधी काही बोलकी आकडेवारी -

ट्राय (Telecom Regulatory Authority of India - TRAI) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३१ डिसेंबर, २०१५ रोजी भारतात-
  • टेलिफोनचे १०३. कोटी ग्राहक आहेत. (भारताची २०१५ अखेर अंदाजे लोकसंख्या - १३२ कोटी)
  • यात १०१ कोटी ग्राहक मोबाईलधारक, तर . कोटी ग्राहक लॅंडलाईनधारक आहेत. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे ७३ कोटी . कोटी होते.)
  • मोबाईलधारक ग्राहकांपैकी ४३ कोटी ग्रामीण, तर ५८ कोटी शहरी भारतातील आहेत. (भारताची ग्रामीण लोकसंख्या ~६८%)
  • दर १०० लोकसंख्येमागे असणा-या मोबाईलधारकांच्या एकूण संख्येला mobile teledensity म्हणतात. शहरी भारतात हा आकडा १४७ (एक व्यक्ती एकापेक्षा अधिक सिम कार्ड घेवू शकते), तर ग्रामीण भारतात हा आकडा ४९ आहे. (३१ डिसेंबर, २०१० रोजी हे आकडे अनुक्रमे १४१ ३० होते.)
याचा अर्थ मोबाईलधारकांची संख्या वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागातील मोबाईलधारकांचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत आहे. स्मार्टफोनच्या कमी होणा-या किंमती मोबाईल वापराचे कमी होणारे दर यामुळे इंटरनेट त्यामार्फत ज्ञान ग्रामीण भारतात पोचण्याची संधी वाढली आहे. आता भारतातील इंटरनेटची काही आकडेवारी पाहू. (स्त्रोतInternet and Mobile Association of India - IAMAI).

  • डिसेंबर २०१५ अखेर भारतात जवळपास ४० कोटी इंटरनेटचे वापरकर्ते आहेत
  • इंटरनेटचे वापरकर्ते कोटीवरून १० कोटीपर्यंत पोचण्यासाठी एक दशकाहून अधिक काळ लागला. १० कोटीवरून २० कोटीपर्यंत पोचण्यासाठी वर्षे लागली. ३० कोटीवरून ४० कोटीपर्यंत पोचण्यासाठी केवळ वर्ष लागले.
  • डिसेंबर २०१५ अखेर भारतातील इंटरनेटचे तब्बल ३१ कोटी वापरकर्ते मोबाईल फोनवरून इंटरनेट वापरतात. (२२ कोटी - शहरी, कोटी - ग्रामीण) एका वर्षात हे प्रमाण शहरी भागात ७१ % नी तर ग्रामीण भागात ९३ % नी वाढले आहे.

आपल्याला आवडो किंवा आवडो, मोबाईल इंटरनेट शहरात बहुतेक लोकसंख्येपर्यंत पोचले आहेत, खेड्यापाड्यात अगदी प्रचंड वेगाने पोचत आहेत. 3G मुळे मोबाईलमार्फत इंटरनेटचा वापर खूप सोपा झाला. 3G पासून 5G Internet of Things (मोबाईल फोनच नाही, तर सर्वच उपकरणे इंटरनेटद्वारे एकमेकांना कनेक्टेड असतील) पर्यंतचा मार्ग स्पष्टपणे आखला गेला आहे. मोठमोठ्या उद्योजकांनी यात गुंतवणूक सुरू केली आहे. या गाडीला ब्रेक नाही, रिव्हर्स गिअर नाही. समाजातील समस्या सोडवण्याची इच्छा असणा-या आपल्या सर्वांना या होत असलेल्या बदलाची जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीत त्यानुसार योग्य बदल करणे आवश्यक आहे.

निसरडा रस्ता -
लहानपणी विटी-दांडू, गोट्या आपण जितक्या सहजपणे हाताळायचो, तितक्या सहजपणे आजची लहान मुले स्मार्टफोन, टॅब्लेट हाताळत आहेत. वयात येणा-या मुलामुलींना भरकटवण्याची खूप मोठी ताकद मोबाईल इंटरनेट मध्ये आहे. स्मार्टफोनच्या व्यसनाकरिता व्यसनमुक्ती केंद्रेही सुरू झाली आहेत.

इंटरनेटचा वापर खूप वाढला असला तरी अजूनही तो न्याय्य योग्य नाही. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७१% पुरूष : २९% स्त्रिया असे प्रमाण आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ८८% पुरूष : १२% स्त्रिया इतके व्यस्त होते. ग्रामीण भागात करमणूक हेच इंटरनेट वापराचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर social networking संपर्कासाठी इंटरनेट वापरले जाते. ग्रामीण भागातील ७५% इंटरनेटचे वापरकर्ते १८-३० वयोगटातील आहेत. जर करमणूक हा इंटरनेटचा प्रमुख उपयोग असेल तर त्यापायी खूप मोठी तरूण क्रयशक्ती वाया जाण्याचा धोका संभवतो. माहितीसाठी ज्ञानासाठी इंटरनेट वापरण्याचे प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेत ज्ञान सहजासहजी उपलब्ध नाही. इंटरनेटवरील जवळपास ५६% माहिती इंग्रजीत आहे, केवळ .% माहिती भारतीय भाषांमध्ये आहे.

अडचणींमध्ये लपलेल्या संधी -

मात्र अडचणी कधीच एकट्या येत नाहीत. त्या आपल्यासोबत आव्हाने आणि संधी घेवून येतात. इंटरनेटवर भारतीय भाषांत माहिती व ज्ञाननिर्मितीची मोठी गरज व संधी आहे. करमणूकीसोबतच माहिती, ज्ञान व आपल्या समस्या सोडवण्यासाठी इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे आपण कार्यकर्त्यांना शिकून लोकांपर्यंत पोचवण्याची गरज व संधी आहे. सशक्तीकरणासाठी स्त्रियांपर्यंत इंटरनेट पोचवण्याची गरज व संधी आहे. तरूणांमध्ये इंटरनेट वापराचे आकर्षण दिसते, तसेच त्यांच्यात इंटरनेट वापराचे प्रमाणही मोठे आहे. त्यांच्यापर्यंत सामाजिक संदेश पोचवण्यासाठी एक आयता प्लॅटफॉर्म आपण काहीही न करता आपल्याकडे उपलब्ध आहे. ३१ डिसेंबरला दारूच्या मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. दारूचे संस्कृतीकरण होते. ३१ डिसेंबर, २०१५ ला नायनांनी तरूणांकडून दारूसंबंधी प्रश्न मागवून त्यांची शास्त्रशुद्ध उत्तरे दिली. सोशल मेडियामार्फत ही प्रश्नोत्तरी २ दिवसांत जवळपास ५० हजार लोकांपर्यंत पोचू शकली.
'झुंज दुष्काळाशी' या मोहीमेअंतर्गत ऐन मे महिन्याच्या दुपारी जालन्यातल्या शेतात फिरून आम्ही पाणलोट क्षेत्राचे नियोजन करत होतो. शेताची लांबी रूंदी मोजायची होती. शेताच्या कोप-यातले एक झाड सोडले तर नजरेत दूरदूरपर्यंत सावलीसाठी झाडच नव्हते. आम्ही या झाडापासून सुरूवात केली. मेजरींग टेप घेवून आम्ही शेताच्या परीघावरून चालू लागलो. लांबी रूंदी मोजून पुन्हा झाडापर्यंत आम्ही पोचलो तेव्हा पाऊणएक तास उलटून गेला होता. पहिल्या शेतातच आम्ही थकून गेलो. झाडाखाली बसलेला आपला निर्माणचा मित्र अमोघ पांडे मोबाईलमध्ये काही तरी पाहत होता. तो काय करतोय हे सहज उत्सुकतेने पाहिलं. त्याच्या स्क्रीनवर गुगल मॅपच्या मदतीने याच शेताचा नकाशा होता. खाली स्केल होती. स्केलच्या मदतीने आम्ही लांबी रूंदी मोजली. पाऊण तासांच्या पायपीटीनंतर जितकी लांबी रूंदी आम्ही मोजली, जवळपास तितकीच झाडाखाली बसून पाऊण मिनिटात निघाली. इंजिनिअर असून हे सुचलं नाही म्हणून मी खजिल झालो.

तर मोबाईल आणि इंटरनेटमुळे या अलिबाबाच्या गुहेत दडलेल्या problem solving च्या असंख्य शक्यता ख-या होऊ पाहत आहेत. पण मोबाईल आणि इंटरनेट ही साधने आहेत, साध्य नाहीत याचं भान आजपासूनच ठेवूयात. नाहीतर कासिमप्रमाणे आपण या फसव्या गुहेत शिरू खरे, पण problem solving साठी गरज पडल्यास बाहेर पडू शकणार नाही.
निखिल जोशी