7 अॉक्टोबर, 2020
विरंगुळा
Monday, October 4, 2021
Sunday, October 3, 2021
प्लास्टिक बंदी
"प्लास्टिक हटवा. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कॅरी बॅग मागू नका. स्वतःची कापडी पिशवी बरोबर ठेवा."
पुण्यातील दुकानातला हा फलक...
हा फलक स्वतःच प्लास्टिकमध्ये लॅमिनेट केला गेलेला आहे.
या फलकाच्या सर्व बाजूंनी प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या वस्तू विकायला ठेवल्या आहेत. चटणी, मसाला, केक, कॉफी पावडर, चॉकलेट, पाण्याची बाटली, वॉशिंग पावडर, बॅटरीज, .....
म्हणजे कापडी पिशवी आणून प्लास्टिक टाळायचे आणि त्यात प्लास्टिकमध्येच पॅक केलेले साबण, कॉस्मेटिक्स, पाणी, विविध अन्नपदार्थ, औषधे, वस्तू इ. भरभरून न्यायच्या...
हे चित्र पाहून एक कार्टून आठवते.. त्यात हौदाचा नळ चालू आहे, नळाद्वारे घरभर पाणी पडत आहे व एक भोळा माणूस कापडाने फरशी पुसत आहे...
प्लास्टिक बंदीसारख्या निर्णयाचे मनापासून स्वागतच आहे. ही चांगली सुरूवात आहे. मात्र दुकानातल्या सगळ्याच वस्तू प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या आहेत. हे सिंगल युज प्लास्टिकच आहे.
प्लास्टिक पॅकिंग करणा-या कंपन्यांसाठी कठोर नियम करण्यास सरकार तयार आहे का?
प्लास्टिक कच-याची जबाबदारी स्वीकारण्यास कंपन्या तयार आहेत का?
त्याचा भार काही प्रमाणात उचलायला आपण नागरिक तयार आहोत का?
20 फेब्रुवारी, 2019
Sunday, March 24, 2019
Subscribe to:
Posts (Atom)