एक थेंब पाण्याचा
जो सामावून घेतो, हळुवारपणे सूर्याचा एक किरण
अन क्षितिजावर उधळतो, इंद्रधनुचे सात सुंदर रंग
एक थेंब पाण्याचा
कधी उमलतो दवबिंदुच्या रूपात, मावळणाऱ्या फुलावर
आणि हलकेच झाकून टाकतो पिकल्या पाकळीचे व्यंग
एक थेंब पाण्याचा
टपकतो एखाद्या निश्चलशा तळ्यात, घेऊनि घनांचा
तेंव्हा उठतात त्याच्याही नीरस चाकोरीत, चैतन्याचे हरवलेले तरंग
एक थेंब पाण्याचा
कधी तरळतो नकळत, पडद्याशी डोळ्यांच्या
आणि अलगदपणे उलगडतो साऱ्या भावपटाचे अंतरंग
Agadich jamlay!!!
ReplyDeleteVed!!!
nice one..
ReplyDeleteapratim!!
ReplyDeleteDhanyawad!!!
ReplyDeletekavita mast aahe...ani photo pan!
ReplyDeletesunder...
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!