Monday, November 14, 2011

गुंड्या आणि बंड्या



यक कुटुंब व्हतं भलं
घरामंदि सुख त्यांच्या खेळं
सोसुनी भुकेची झळं
केलं कष्ट चाखाया फळं
कष्टाचि मिळाली फळं
लवकरच झालं अन् जुळं
(यक गुंड्या नि यक बंड्या)
गुंड्या शाणं, बंड्या खुळं
गुंड्या चिकनं गोरंपान
बंड्या कुळकुळीत हो काळं
(त्यांच्या आईला प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


(दोघं साळंला जाऊ लागले)
गुंड्या हुश्शार आनी न्येकं
वर्गामंदी नंबर येकं
बंड्या कसा करंटा लेकं
परिक्षेत फ्रॉड अन् फेकं
गुरुजी म्हणाले 'इनफ'
काढले जालीम औषध येकं
आधि दिला छड्यांचा शेकं
मग म्हणाले 'गिव्ह हिमं ब्रेकं'

गुंड्या येळीच म्याट्रिक झालं
बंड्या किती किती व्हं ढकललं
सातव्या यत्तेस असं चिकटलं
ह्याच्यापरीस फेविकॉल बरं
(गुरुजींना प्रश्न पडला)
द्येवा असं कसं हो झालं?


गुंड्या कालेजात जाई
बंड्या गल्लीमधला भाई
अशी वरसं गेले काही
गुंड्या पोलीस खात्यात इन
बंड्या हप्ता अन् स्मगलिंग
गुंड्या पराक्रम नवनवा
आनि बंड्या........
नवनव्या जेलांची हवा


येके दिवशी चिमित्कार झाला
घरामंदी फोन वाजला
हिकडं आयेनं फोन उचलला
पलिकडून आवाज आला
तोऱ्यात बाबू बोलला
'तुमचा बंड्या मंत्री झाला नि गुंड्या शिक्यूरिटी'
आज बंड्या ऐटीत चालं नि गुंड्या शेपटी
हाच जगाचा न्याव असे हो द्येवा, जि रं दाजि रं जी जी, रं जी जी जी जी हो!



(आय.आय.टी. कानपूरमधील महाराष्ट्र मंडळाच्या 'प्रतिबिंब' या २००९ साली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात हा परफॉर्मन्स केला होता.)



    - निखिल अनिल जोशी
   १४ जानेवारी २००९
   कानपूर

2 comments:

  1. laiiiiiiiiiiiiii zyakkkkkkkkk gana ahe he.......!!!!!!!!!!!!!!!!!!!
    nadkhulaaaaaaa...!

    ReplyDelete
  2. लय भारी... :) आवडलंय :)

    ReplyDelete